अंधाऱ्या रात्रीला तेज्याचा 
तेजोवलय प्रकाश तू देशील का ?
स्वप्नामध्ये तरी सखे 
माझी तू होशील का ?

स्वप्न आहे उद्याचे त्यास 
साकार तू करशील का ?
माझ्या या वेड्या वाकड्या जीवनाला 
आकार तू देशील का ?

माझ्या सोबतीच्या क्षणाची 
आठवण तू ठेवशील का ?
आज ना उद्या सखे 
माझी तू होशील का ?

चांदन्या रात्री चांदोबा शी 
मनातले तू बोलशील का ?
आहे मी तुझी सखी असे
एकदा तरी बोलशील का ?

उगवत्या सूर्याला वंदन 
तू कारशील का ?
या जन्मा मध्ये संखे 
माझी तू होशील का ?   

कवी 
सतीश भोने.